
सामना प्रतिनिधी । बीड
जनआशिर्वाद यात्रेत बीडमध्ये आयोजित ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हा रूग्णालयातील अस्वच्छता नष्ट होईल. उद्यापासून जिल्हा रूग्णालय स्वच्छ होईल असा शब्द आदित्य ठाकरे यांनी दिला होता. दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. बीड जिल्हा रूग्णालयामध्ये सकाळपासूनच साफसफाईचे आणि स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले.
बीडमध्ये आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आरफीया शेख या बारा वर्षीय विद्यार्थिनीने आमच्या बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. याबाबत आपण न्याय द्यावा असे म्हटले होते. त्या विद्यार्थीनीला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्यापासून जिल्हा रूग्णालय स्वच्छ असेल हा शब्द मी देतो आणि अवघ्या चोवीस तासात आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्दा युवासैनिकांनी पूर्ण करून दाखवला. बीडच्या जिल्हा रूग्णालयात सकाळपासूनच साफसफाईला आणि स्वच्छतेला सुरूवात झाली. युवासैनिकांनी जातीने उपस्थित राहून जिल्हा रूग्णालयाच्या साफसफाईचे काम हाती घेतले



























































