भरधाव वेगातील कार विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धडकली, चार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगातील इंडिगो कार विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील तांदळा येथील गवते वस्तीवर रात्री 12 च्या सुमारास घडली.

या अपघाताचा मोठा आवाज आल्याने वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारच्या धडकेत विजेच्या ट्रान्सफॉर्मर पुर्णतः गाडीवर कोसळला. त्याखाली तीन जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी अवस्थेत गाडीत दबले गेले होते. नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र एका जखमीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हे प्रवासी अंबेजोगाई तालुक्यातील असल्याचे समजते.