Corona – बीड जिल्ह्यातील पान टपऱ्या बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या आणि तंबाखूमिश्रित पदार्थ विक्री करणारी दुकाने 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रस्त्यावर थुंकणे किंवा धूम्रपान करण्यामुळे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होऊ शकतो असे लक्षात आल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असेही आदेशात सांगितले गेले आहे .