आता लक्ष्य युरो २०२०

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सेंट पीटर्सबर्ग

शेजारी देश फ्रान्सकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या बेल्जियमच्या आशांना सुरुंग लागला. मात्र गोल्डन जनरेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेल्जियमच्या या संघाने आता २०२० सालामध्ये होणाऱ्या युरो फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या स्पर्धेत पात्र ठरून जेतेपद पटकावण्यासाठी जिवाचे रान करण्याचा चंग खेळाडूंसह प्रशिक्षक रोबर्टो मार्टिनेझ यांनी यावेळी बांधलाय.