पनीरच्या ग्रेव्हीमध्ये सापडले झुरळ, व्हिडीओ बनवणाऱ्या महिलेला कर्मचाऱ्यांनी केली धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरुमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. गुरुवारी एका हॉटेलमध्ये महिलेच्या जेवणात झुरळ सापडले आणि एकच गोंधळ उडाला. ज्या महिलेसोबत ही घटना घडली ती एक वकिल आहे. आता या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना गैरवर्तन, धमकी देणे आणि त्रास दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे.

वृत्तानुसार, महिला वकिल शुक्रवारी एका हॉटेलात दुपारी जेवायला गेली होती. त्यांनी जेवायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना पनीरच्या ग्रेव्हीमध्ये झुरळ दिसले. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क केला. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने आपल्या मोबाईलफोनने पनीरमध्ये असलेल्या झुरळाची मोबाईलमध्ये शुटींग सुरु केली. दरम्यान तिथे हॉटेल कर्मचारी आले आणि महिलेला ध्कका दिला आणि तिला ढकलत धमकीही दिली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर बंगळुरु पोलिसांनी हॉलेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आणि सध्या त्याचा तपास सुरु आहे.