अंधेरीत ‘बेस्ट’ बसला आग; सुदैवाने प्रवासी बचावले, 15 दिवसांत दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

वांद्रे एस. व्ही. रोड जंक्शन येथे 25 जानेवारीला मातेश्वरी कंपनीची बस जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना अंधेरी चकाला येथे आज ‘बेस्ट’च्या याच कंपनीच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

बसच्या गिअर बॉक्समध्ये स्पार्क झाला आणि बसने पेट घेतला. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते, मात्र बस वाहकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्याने 25 प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेची चौकशी अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, भाडेतत्त्चावरील बसेसना आग लागल्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.