
शेअर बाजारातील गुंतवणूक नेहमी जोखमीची असते. मात्र, सध्या अनेक गुंतवणूकदार पेनी स्टॉकमधून मालामाल होत आहेत. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक अतिशय धोक्याची असते. त्यामुळे अर्थतज्ज्ञ नेहमी ब्लू चिप फंडमधील शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र, शेअर बाजाराचा अभ्यास असलेले आणि बाजाराची दिशा समजणारे अनेकजण काही चांगले पेनी स्टॉक विकत घेतात आणि अल्पावधीतच त्यांनी चांगले रिटर्नही मिळतात.
कमी किंमतीत मिळणाऱ्या शेअरला पेनी शेअर किंवा पेनी स्टॉक म्हणतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असून सावधतेने गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, पेनी स्टॉमधील गुंतवणूक अनेकांसाठी फायद्याची ठरत आहे. लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग यासारख्या सेवा देणाऱ्या Flomic Global Logistics या कंपनीने वर्षभरात दमदार कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना या कंपनीने जबरदस्त टक्कर दिली आहे.
गेल्या वर्षभरात या शेअरने दमदार कामगिरी करत वर्षभरात हा शेअर 5 हजार टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी 8 फेब्रुवारीला हा शेअर 2.93 रुपयांना होता. आता हा शेअर बीएसईवर 145 रुपयांपर्यंत पोहचला आहे. म्हणजेच वर्षभरात या शेअरने 4900 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. या काळात या शेअरने एवढे जबरदस्त रिटर्न दिले आहेत. तर या काळात शेअर बाजार 13.41 टक्क्यांनी वाढला आहे.
वर्षभरात बीएसईवर लिस्टवर असलेल्या 30 मोठ्या कंपन्यांचे शेअर 13.41 टक्क्यांनी वाढले आहेत.तर या पेनी स्टॉकने दमदार कामगिरी नोंदवत अनेक पटींनी रिटर्न दिले आहेत. वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुतंवणाऱ्यांचे आज 50 लाख रुपये झाले आहेत. सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असून अनेक शेअरमध्ये घरसण होत आहे. तरीही हा पेनी स्टॉक तेजीत आहे. सध्या या शेअरची किंमत 145 रुपये आहे.
या कंपनीचा एमकॅप 100 कोटींच्या आसपास आहे. हा शेअर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 216 रुपयांपर्यंत पोहचला होता. कंपनीच्या दोन प्रमोटर्सकडे कंपनीची 27.49 टक्के भागीदारी आहे. तर 72.51 टक्के गुंतवणदारांचे पैसे आहेत. सुमारे 9,829 गुंतवणूकदारांकडे 52.20 लाख शेअर आहेत. मार्च 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 5040 टक्क्यांनी वाढून 2.47 कोटी रुपये झाला होता. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी ही संधी हेरत या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि वर्षभरातच चांगले रिटर्न मिळवले आहेत.






























































