दीनदयाळ उपाध्याय वस्तीगृहास लागली आग, अडकलेल्या 74 विद्यार्थी- विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात यश

bhiwandi boarding

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत रम लॉजिस्टिक कॉम्प्लेक्समध्ये ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्र असून या केंद्राच्या वसतिगृहात आग लागली. दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृह इमारतीत धूर पसरल्याने या केंद्रातील 74 विद्यार्थ्यांवर मोठा बाका प्रसंग ओढवला. विद्यार्थ्यांनी टेरेसचा आसरा घेतला त्यानंतर आलेल्या भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांची करून सुटका केली.

या वसतिगृहात सध्या 74 प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी 30 मुली असून हे सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून त्यांना या ठिकाणी कॉल सेंटर एक्झिकेटीव्ह व डाटा इन्ट्री चे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जात आहे .

या आगीचे करण अजून स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशामक दलाच्या भिवंडी जवानांनी या सर्व प्रशिक्षणार्थींची सुखरूप सुटका केली परंतु या आगीत सर्व प्रशिक्षणार्थींचे कपडे अत्यावश्यक साहित्य या आगीत पूर्ण जाळून खाक झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या