
गुजरातमध्ये पुन्हा एकदा पाटीदार समाजाच्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली आहेत. रविवारी गांधीनगर येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
विजय रुपाणी यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला होता. यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री मनसुख मंडिविया, पुरुषोत्तम रुपाला, प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल, सीआर पाटील हे देखील रेसमध्ये होते. मात्र रविवारी गांधीनगर येथे झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करण्यात आला.
Gujarat: BJP MLA Bhupendra Patel elected as the new leader of BJP Legislative Party pic.twitter.com/nXeYqh7yvm
— ANI (@ANI) September 12, 2021
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेले भूपेंद्र पटेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. घाटलोदिया मतदारसंघातून ते भाजपचे आमदार आहेत. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा 1 लाख 17 हजार एवढ्या विक्रमी मतांनी पराभव केा होता. भूपेंद्र पटेल हे पाटिदार समाजातून येतात.
अमित शहांचे ट्वीट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या विकासाच्या यात्रेला अधिक गती मिळेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
श्री @Bhupendrapbjp जी को @BJP4Gujarat विधायक दल का नेता चुने जाने पर हार्दिक बधाई व शुभकामनाएं।
मुझे विश्वास है कि @narendramodi जी के मार्गदर्शन व आपके नेतृत्व में प्रदेश की अनवरत विकास यात्रा को नई ऊर्जा व गति मिलेगी और गुजरात सुशासन व जनकल्याण में निरंतर अग्रणी बना रहेगा।
— Amit Shah (@AmitShah) September 12, 2021


























































