
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारने एसटी कर्मचाऱयांसाठी गुड न्यूज दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के, घरभाडे भत्ता 8-16-24 टक्क्यांवरून 10-20-30 टक्के आणि वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात आल्याची घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. मात्र यामुळे महामंडळावर 45 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.





























































