‘त्या’ मुलीचा मृत्यू बंदमुळे झाला नाही, अधिकाऱ्यानं केलं स्पष्ट

68

सामना ऑनलाईन । पाटणा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतलेल्या काँग्रेसला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण त्याच वेळी बिहारमध्ये बंद पुकारल्यानंतर करण्यात आलेल्या ट्रॅफिक जाममध्ये दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त देण्यात होते मात्र त्या मुलीचा मृत्यू बंदच्या गर्दीमुळे झालेला नाही, असे विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

जेहानाबाद विभागीय जिल्हा अधिकारी परितोष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहाराच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून बंदची हाक देण्यात आली आहे. जागोजागी रास्तारोको सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात ट्रॅफिक जाम आहे. मात्र असे असले तरी त्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू हा बंदमुळे झालेला नाही. तर तिच्या पालकांकडून मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यास झाला. त्यातच मुलीचा मृत्यू झाला. त्यांच्या उशिरा निघण्याचा बंदशी संबंध नाही, असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या