
शिवतिर्थावर होणाऱ्या अतिविराट मेळाव्याला निघण्यापूर्वी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपपुरस्कृत होणारी मिंध्याची सभा आण भाजपवर जोरदार प्रहार केला. भाजपले फोडलेले गट, तट, पक्ष शेवटी त्यांच्याच नाल्यात विलीन होतील. निवडणुकांमध्ये जनता त्यांना चिरडून टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला 50 वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. आता वर्षभरापासून शिवसेनेतून फुटलेला गट जो भाजपपुरस्कृत आहे, तो भाजपच्या सांगण्यावरून मेळावा घेत आहे. शिवसेनेत फूट पाडणे हे भाजपचे जुने स्वप्न आहे. शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची भक्कम एकजूट उभई केली, ती तोडायची, हा त्यांचा डाव आहे. त्यामुळे आमचा अधिकृत मेळावा होत असताना फुटीरांचा दुसरा मेळावा होत असल्याने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
आमच्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज्यात आणि देशात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिका काय असेल याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मेळाव्यात त्यांचे दिशादर्शक भाषण होणार आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते गुजरात मॉडेल आहे. तोडा, फोडा, राज्य करा, हे त्यांचे राजकारण आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा जुना राग आहे. त्यामुळे ते असे राजकारण करत आहेत. मात्र, भाजपने फोडलेले से सर्व गच भाजपच्याच नाल्यांमध्ये विलीन होणार आहे. जनता त्यांना चिरडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
ते स्वतःला निष्ठावान म्हणतात, मग आम्ही कोण आहोत. आम्ही शिवैनिक कोण आहोत. ते भाजपचे निष्ठावान आहेत. त्यांनी त्यांची निष्ठा भाजपचरणी वाहली आहे. शिवसेनाप्रमुखांची ही विचारधारा कधीही नव्हती. वेगळ्या विचारांचे पक्ष आज दडपशाहीविरोधात उभे आहेत. ते चिरडले जाणार आहेत. शिवसेनाप्रमुखांची भक्ती ते दाखवतात. मात्र, त्यांनी राज्याचे आणि शिवसेनेच्या विचारांचे नुकसान करत आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी भाजप आणि मित शहा यांच्या कृपेमुळे आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवत तुरुंगात टाकले होते. आता आज या सभेला आपण उपस्थित राहणार आहोत. या मेळाव्यात आम्ही राज्याचे आणि देशाचे अनेक प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे ते म्हणाले.


























































