भाजप उमेदवाराने भांडी घासली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । इंदूर

निवडून येण्यासाठी उमेदवार काय वाट्टेल ते करतील हेच खरे. मध्य प्रदेश विधानसभेचा प्रचार रंगात आला असून इंदूरच्या सावेर मतदारसंघातून भाजपतर्फे राजेश सोनकर उभे आहेत. सोनकर यांनी शनिवारी चक्क एका घरात जाऊन भांडी घासली आणि मत द्या अशी विनवणी केली. त्या घरच्या गृहिणीने त्यांना रोखले खरे, पण सोनकर हे भांडी घासूनच उठले.