भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर मोक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरातील राजकीय कार्यअंकुश चत खूनप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेला आरोपी, भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अंकुश चत्तर यांचा 15 जुलै रोजी रात्री पाईपलाईन रस्त्यावरील एकवीरा चौकात सिनेस्टाईल प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भाजप नगरसेवक गुन्हेगार स्वप्नील रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुहें, सूरज ऊर्फ विकी राजन मिथुन सुनील धोत्रे, राजू फुलारी अरुण फार वा आठ आरोपींना अटक केली असून, हे सर्व सध्या पोलीस कोठडीत आहेत. या खून प्रकरणात अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास तो खून पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे. नगरसेवक स्वप्नील शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सध्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.