भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्या वज्रमुठीचा सामना करावा; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यातील सावा मैदानावर सायंकाळी विराट सभा झाली. या सभेला जनतेचा महासागर उसळला होता. या सभेत होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्याचा चांगलाच समाचार घेतला. भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्या वज्रमुठीचा सामना करून दाखवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी या सभेत दिले.

या सभेत दिसणारी गर्दी ही फक्त जल्लोष असायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, असा निर्धार करा. गद्दारीमुळे महाराष्ट्राला कलंक लागला आहे. तो कलंक आपल्याला मिटवायचा आहेत. तसेच गद्दारी करणारे हातही गाडायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र शूरांचा आणि विरांचा आहे. हा गद्दारांचा नाही. तुम्ही शेतातले तण काढता, तसे गद्दारांना या जळगावच्या सुवर्णभूमीतून उखडून फेका, असे आवाहन त्यांनी केले.

आमचा चोरलेला धनुष्य, चोरलेले पक्षाचे नाव आणि मोदी यांचा फोटो घेऊन या, मी माझे नाव घेत मैदानात उतरतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे, ते समजेल. आगामी निवडणुका तुम्ही मिंध्यांच्या नेतृत्वाखाली लढणार का, असा सवालही त्यांनी भाजपला केला. फक्त 48 जागा भाजप मिंध्यांना देणार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढणार का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

अशी झाली पाचोऱ्यातील सभा –

  • आता समोर कोणीही आले तरी त्यांचा फडशा पाडल्याशिवाय आपण थांबत नाही.
  • सभेत घुसण्याची वल्गना करणारे आलेले नाही, येण्याची हिंमत नाही त्यांच्यामध्ये
  • भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वज्रमुठीचा सामना करून दाखवावा
  • ही गर्दी फक्त जल्लोष असायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, हा निर्धार करा.
  • महाराष्ट्र शूरांचा आणि वीरांचा आहे, गद्दारांचा नाही, शेतातले तण उखडता तसे गद्दारांना अखडून फेका
  • आमचे चोरलेले धनुष्य आणि मोदींचे नाव घेऊन या, मी माझे नाव घेऊन येतो, बघूया जनता कोणासोबत आहे
  • भाजप मिंधे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे का
  • खासघरमध्ये जो कार्यक्रम घेतला, तो फक्त मतदार डोळ्यासमोर ठेवतच झाला.
  • गद्दारांच्या हातात भगवा शोभून दिसत नाही, ही चोरट्यांची आणि भामट्यांची औलाद आहे.
  • निवडणुकांसाठी त्यांनी पुलवामा आणि जवानांचे बळी घेतले, हे मान्य आहे काय
  • हे असे हिंदुत्व आपल्याला मान्य आहे काय
  • आजही रोशनी शिंदे यांची तक्रार घेतलेली नाही, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत.
  • महिलांना माराहण करणारे विकृत हिंदुत्व आम्हला मान्य नाही.
  • महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यानंतर महिलांची तक्रारही घेतली जात नाही. त्यांच्यावरच तक्रारी दाखल होतात
  • महाराष्ट्रात गोहत्या बंदी आहे, गोव्यात नाही. हे कसला न्याय, हे कसले हिंदुत्व
  • आम्ही हिंदुत्व सोडले नाही, सोडणार नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीय़त्व आहे, त्यांचे हिंदुत्व काय आहे, ते सांगा
  • आम्ही कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही. कोरोना काळात मंदिरे उघडण्यासाठी त्यांचा घोषा होता.
  • आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे म्हणातात, एक उदाहरण तरी दाखवा.
  • सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे, न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, ही अपेक्षा आहे.,
  • त्यासाठी घराण्याचा वारसा लागतो. तो वैशालीताई यांच्यामागे आहे.
  • तुम्हाला आगा ना पिछा तुम्ही जोळी घेऊन माझ्या जनतेच्या हाती भिकेचा कटोरा देऊन निघून जाल.
  • मी घरी बसून जे काम केले, ते काम हे वणवण फिरूनही करू शकत नाही.
  • शेतकरी मेहनत करतो, तो श्रीमंत होत नाही पण पंतप्रधानांचा मित्र जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो कसा
  • आव्हान स्विकारायला मर्दपणा लागतो, तो त्यांच्यात नाही.
  • टाका आम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाका, एकदा जेलभरो होऊ द्या
  • जे भाजपमध्ये गेले नाहीत, जे आपल्यासोबत राहिले आहेत, त्यांच्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला आहे.
  • सगळेच गुलाबो गँगसारखे नसतात, काही मर्द असतात.
  • भाजपला स्वतःच्या पक्षातील चांगले लोक नको आहेत, इतर पक्षातील भ्रष्ट त्यांना चालतात
  • आज पक्ष, नाव, चिन्ह काहीही नसताना आलेली ही जनता हीच आपली शक्ती आहे.
  • त्यावेळी एकनाथ खडसे भाजपात होते, त्यांना युती तोडण्यासाठी सांगितले होते.
  • आमच्याकडे असताना ते भ्रष्ट, त्यांच्याकडे गेल्यावर ते शुद्ध कसे होतात
  • भाजपात घेताना गोमूत्र टाकून त्यांना शुद्ध करून घेतात का
  • सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांना याबाबत सांगितले होते, मात्र, यावर काही बोलू नये, असे पंतप्रधान म्हणाले होते.
  • सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या माहितीवर कोणीही काही बोलले नाही, मलिक यांच्यामागेच सीबीआय लावली
  • निवडणुका आल्यावर पुन्हा अब की बार, आता त्यांना आपटण्याची वेळ आली आहे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती, किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पच झाले
  • महागाई वाढतेय, बेरोजगारी वाढतेय मात्र, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सुरू आहे.
  • या लोकसंख्येत तरूण आत्महत्या करत असेल तर लोकसंख्यावाढीचा फायदा काय
  • लोकसंख्येच्या बाबतीत आपण देश क्रमांक एकवर आहे.
  • भाजप हे आव्हान नाही, मात्र ते सत्तेत असताना जे नुकसान करत आहेत, ते कसे भरून काढायचे हे आव्हान आहे.
  • आशीर्वाद देणारे लाखो, करोडो हात आमच्यासमोर आहे. या कोणीही समोर या
  • त्यांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही. त्यांच्यासाठी तुमचे एक बोच पुरेसे आहे.
  • गद्दारांकडे स्वतःचे असे काहीच नाही. सर्वसामान्यांचे रक्त पिऊन माजलेली ही ढेकणे आहेत.
  • इमान विसरला त्याने नेक म्हणू नये, जन्मदात्या बापाला विसरला त्याले लेक म्हणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
  • आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या नतद्रष्ट्र सरकारने तुरुंगात टाकले असते.
  • खरे बालणाऱ्यांच्या मागे पोलिसांचा तपासाचा चोकशीचा ससेमिरा लागतो.
  • उलट्या पायाचे सरकार, हेच एक संकट आहे. यांच्या काळात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळाली नाही.
  • गद्दारी करणाऱ्यांनी कलंक लावला आहे, तो धुवून काढायचा आहे, तसेच गद्दारी करणारे हात गाडायचे आहे.
  • निवडून आलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आपल्यासमोर आहेत.
  • त्यांना जसे घोड्यावर चढवले होते. तसे त्यांना आता खाली खेचायचे आहे.
  • आज आरओ तात्या यांची उणीव भासते. एक विश्वासू माणूस जातो, ते खूप मोठे नुकसान असते.
  • सभेत शिरणाऱ्या घुशींना शेपट्या धरून निवडणुकीत आपटायचे आहे.
  • धृतराष्ट्र झालेल्यांना हे समजणार नाही, मात्र, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, जनता सर्व बघतेय.
  • हे पाकिस्तानला विचारले तर त्यांनाही समजेल, आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्यांना ते समजत नाही,
  • हा सर्व जल्लोष आणि उत्साह पाहिल्यावर शिवसेना कोणाची हे कळतंय ना आता
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • या जळगावात लोकसभा, विधानसभा यासाठी शिवसेनेचाच भगवा फडकेल.
  • जळगावात गुलाबो गँग स्थापन झाली. त्यांना 200 कोटी मिळाले.त्यांचा आपण बंदोबस्त करू
  • शिवसेनेच्या नादी लागू नका, महाराष्ट्रासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली.
  • जळगावच्या सुवर्ण नगरीत काही दगड निपजले.
  • पाचोरा कोणाचे याचा निकाल आजच्या या सभेने दिला आहे.
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या संबोधनाला सुरुवात
  • हे सरकार आल्यानंतर 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे.
  • सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात येतात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही.
  • विधापरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे
  • पाचोऱ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या वैशाली पाटील यांच्या संबोधनाला सुरुवात
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांचे स्वागत
  • छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांच्यासह महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्या संबोधनाला सुरुवात
  • हिंदूची मते मिळवण्यासाठी भाजपचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे
  • ज्यांना या सभेच्या गर्दीबाबत शंका असेल त्यांनी येथे येत खुशाल खुर्च्या मोजाव्या.
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या संबोधनाला सुरुवात
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र उत्तर विभाग महिला संघटिका शुंभागी पाटील यांच्या संबोधनाला सुरुवात
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सभेला दणक्यात सुरुवात