भाजप नेत्याच्या भावाचा निर्घृण खून, गुप्तांग कापून रेल्वे रुळावर फेकला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फिरोजाबाद

उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये भाजप नेत्याच्या भावाचा निर्घृण खून करून त्याचे गुप्तांग कापले. व त्याचा मृतदेह फिरोजाबाद रेल्वे स्थानकाच्या रुळावर फेकण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलीस तपास करत आहेत.

भाजपचे बूथ अध्यक्ष अनिल शर्मा यांचा लहान भाऊ दिलीप शर्मा हे आपल्या कुटुबीयांसह कामगार वस्तीत राहत होते. दिलीप शर्मा हे एका बांगड्यांचा कारखान्यात कामाला होते. अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप शर्मा हे रविवारी रात्री 10 वाजता जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. खूप उशिरा झाला तरी ते घरी परतले नाही. सकाळी सात वाजता रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्यांच्या शरीरावर चाकूने वार केले होते. त्यांच्या गुप्तांगासह त्यांचे बोटही कापले होते.

पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलला. याबात पोलीस पुढील तपास करत आहे. 2006 साली अनिल कुमार यांच्या पुतण्याचाही खून झाला होता. त्यानंतर कुठलाच वाद नव्हता. परंतु आता त्यांचा भाऊ दिलीप शर्मा यांचा खून झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.