
विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याला 24 तास पूर्ण व्हायच्या आत भाजपने रविवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला लावला. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवी खेळी खेळली आणि अनपेक्षितपणे नवे मुख्यमंत्री म्हणून पाटीदार समाजाचे नेते भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावाची एकमताने निवड केली. भूपेंद्र यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.
गांधीनगर येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात रविवारी दुपारी काही तास बैठक चालली. या बैठकीत विधिमंडळ नेते म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला, याबाबत तर्पवितका&ंना उधाण आले आहे. याचदरम्यान भाजपने नवीन मुख्यमंत्री निवडीच्या हालचालींना वेग दिला आणि अनपेक्षितपणे भूपेंद्र पटेल यांची नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. बैठकीत विजय रुपाणी यांनीच भूपेंद्र यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी अनुमोदन दिले. भूपेंद्र पटेल हे लवकरच शपथ घेणार आहेत. मात्र शपथविधी सोहळ्याचा दिवस अजून ठरवलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह पृषिमंत्री आर. सी. फाल्दू, पेंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडवीया यांच्या नावाची चर्चा होती. मात्र भाजपने अचानक भूपेंद्र पटेल यांचे नाव पुढे आणत पाटीदार समाजाची मने जिंकली आहेत. पटेल यांनी त्यांना मिळालेल्या नव्या जबाबदारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे विशेष आभार मानले.
कोण आहेत भूपेंद्र?
केवळ बारावी पास असलेले भूपेंद्र पटेल हे कडवा पाटीदार समाजाचे नेते आहेत. ते घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 1 लाख 17 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. संपूर्ण गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत हा सर्वाधिक मतांचा फरक होता. ते याआधी अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे चेअरमनसुद्धा होते.




























































