सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीसाठी स्थायी समितीसाठी शिवसेनेचे यशवंत जाधव, शिक्षण समितीसाठी शिवसेनेच्या अंजली नाईक, सुधार समितीसाठी शिवसेनेचे सदानंद परब, बेस्ट समितीसाठी शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी आज अर्ज दाखल केले. 3 एप्रिल रोजी अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
वैधानिक समित्यांवर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असेच चित्र आहे. संख्याबळाचा विचार करता शिवसेनेकडे 93, भाजपकडे 85 (83+2), कॉंग्रेसकडे 30, राष्ट्रवादीकडे 9, मनसे – 1, समाजवादीकडे 6, एमआयएमकडे 2 जागा आहेत.
दरम्यान, भाजपचा शिवसेनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.


























































