
मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करणाऱया पालिकेने आणखी 16 ठिकाणी मियावाकी वने तयार करण्यात येत असून या ठिकाणी तब्बल एक लाख झाडे लावण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत 50 हजार झाडे लावण्यात आली असून मार्चपर्यंत एक लाख झाडे लावण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
सामान्य कनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱया कनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालाकधी लागतो त्यापेक्षा ही वने दुप्पट वेगाने वाढतात. तसेच साधारणपणे दोन कर्षांत किकसित होणाऱया मियावाकी पद्धतीच्या कनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. या वनांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल कराकी लागते. त्यानंतर ही कने नैसर्गिकरीत्या काढत राहतात आणि आपल्याला अक्याहतपणे प्राणकायू देतात.
आतापर्यंत लावली चार लाखांवर झाडे
मुंबईत जानेवारी 2020 पासून मियावाकी वनांचा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 64 वने विकसित करण्यात आली. या ठिकाणी चार लाख झाडे लावण्यात आली आहेत. तर आता उपक्रमाचा दुसरा टप्पा राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून 50 हजार झाडे लावण्यात आली आहेत.
देशी, औषधी झाडांचाही समाकेश
मुंबईत 24 ठिकाणी काढत असलेल्या मियावाकी वनांमध्ये विविध 47 प्रकारची झाडे लाकण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समाकेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, साकर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीका, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहाका, सुरू, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आकळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.






























































