बेजबाबदार सोसायटय़ांची आता खैर नाही, अग्निशमन यंत्रणा नसेल तर एका महिन्यात कारवाईचा ‘लॉजिकल एण्ड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

मुंबईत आगीच्या दुर्घटनांमुळे होणारी जीवित-वित्तहानी रोखण्यासाठी पालिकेने वेगाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली असून बेजबाबदार सोसायटय़ांविरोधात आता एका महिन्यात कारवाईचा ‘लॉजिकल एण्ड’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे तपासणीत बंद आढळलेली अग्निशमन यंत्रणा सुरू करण्यासाठी 120 दिवसांची मुदत मिळणार नसून एका महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले. कायदेशीर कारवाईनंतर वीज-पाणी कापण्याची कारवाई होऊ शकते.

मुंबईतील सोसायटय़ा, रुग्णालये, शासकीय-खासगी आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम-कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक बेजबाबदार आस्थापने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दुर्घटनेनंतर समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने आता ‘अग्निसुरक्षेची विशेष मोहीम’ हाती घेतली आहे. याआधीच्या पालिकेच्या तपासणीत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या 327 सोसायटय़ांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामधील 78 सोसायटय़ांनी अग्निशमन यंत्रणा तैनात केली आहे. तर 109 ठिकाणी कामे सुरू असून तीन जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तर अग्निशमन दलाकडून 1517 हॉस्पिटल, नर्सिंग होमचेही फायर ऑडिट करण्यात आले असून यात 247 खासगी रुग्णालये-नर्सिंग होम आणि पालिकेच्याही 6 रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र पालिकेच्या नोटीसच्या दणक्यानंतर यातील 235 ठिकाणी अग्निसुरक्षा तैनात करण्यात आली आहे, तर बेजबाबदार 19 आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

अशी सुरू आहे कारवाई

z पालिकेच्या सर्व 24 वॉर्डमध्ये प्रत्येकी चार ते पाच अधिकाऱयांची टीम सोसायटय़ा, आस्थापनांमध्ये जाऊन अग्निसुरक्षेची तपासणी करीत आहे. z यामध्ये अग्निसुरक्षा नसल्यास किंवा असूनही कार्यान्वित नसल्यास नोटीस दिली जात आहे. यामध्ये 22 ऑक्टोबरच्या लालबागमधील ‘अविघ्न’ इमारत आग दुर्घटनेनंतर कारवाई तीक्र करण्यात आली आहे. z या कारवाईत आतापर्यंत सुमारे 40 सोसायटय़ांना नोटीस बजावण्यात आली आहे. या आस्थापनांनी एका महिन्यात अग्निशमन यंत्रणा सुरू करणे बंधनकारक राहणार आहे.

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी बेजबाबर आस्थापनांना जरब बसवण्यासाठी ‘स्पेशल ड्राइव्ह’ सुरू असून एका महिन्यात कारवाईचा ‘लॉजिकल एण्ड’ केला जाईल, जेणेकरून संबंधित ठिकाणी आवश्यक कार्यवाही होऊन दुर्घटना टळतील. फायर ऍक्ट आणि त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार ही कारवाई केली जाईल. कायदेशीर कारवाईनंतर वीज-पाणी कापण्याची कारवाई होऊ शकते.
z हेमंत परब, प्रमुख अग्निशन दल अधिकारी