रेल्वे तिकिटाचे काळा बाजार करणारा आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पूर्णा

टरनेट कॅफे आणि ऑनलाईन सव्र्हिसच्या माध्यमातून बनावट रेल्वेची तिकिटे प्रवाशांना देत असताना रेल्वे सुरक्षाबलाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ५३ हजारांचे रेल्वेचे ई-तिकिट आणि बनावट आय.डी. आढळून आल्याने रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी बालाजी गंगाधर गुंडाले यास गजाआड करण्यात आले आहे. या प्रकरणी पूर्णेच्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून पूर्णा रेल्वेस्थानकात रेल्वे ई-तिकिटाचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार येत आहेत. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचत मोठ्या शिताफिने एकास जेरबंद केले आहे. बालाजी गुंडाळे हा वसमत तालुक्यातील बुधवार पेठ येथे रहिवाशी असून त्याने बनावट आय.डी. तयार करुन ५३ हजारांची रेल्वेची ई-तिकिटे विक्री केल्याचे आढळून आले.

रेल्वे सुरक्षा बल विशेष पथकाकडून इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा रेल्वे ई- तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या इंटरनेट कॅफे आणि ऑनलाईन सर्व्हिसेसच्या विरुध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच अंतर्गत वसमत येथे रेल्वे ई-तिकिटांचे अवैधरित्या धंदा करणाऱ्या ‘बालाजी ऑनलाईन सर्व्हिसेस सेंटर येथे विशेष पथकाकडून धाड टाकण्यात आली. यावेळी विविध बनावट आयडी तयार करून तसेच ग्राहकाकडून अव्वाच्या सस्वा पैसे घेऊन ऑनलाईन तिकिट काढताना बालाजी गंगाधर गुंडाले (रा. बुधवारपेठ, वसमत जि.हिंगोली) पकडण्यात आले. त्यांचाकडून रेल्वेचे, ४५ ई-तिकीट तसेच कॉम्प्युटर सेट आणि मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे आधारकार्ड असे एकूण १ लाख रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.