
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायम चर्चेत असते. नुकतेच आलियाने ‘मेट गाला 2023’ या फेस्टीव्हलसाठी उपस्थिती लावली होती. आलिया या इव्हेंटमध्ये पांढरा गाऊन घालून अगदी परीसारखी दिसत होती. तिच्या लूकसोबत तिच्या ड्रेसचेही प्रचंड कोतुक झाले. मात्र सध्या तिचा एक व्हिडओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामध्ये न्यूयॉर्कच्या फोटोग्राफर्सनी तिला ऐश्वर्या म्हणून बोलावल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
प्रबल गुरूंग या फॅशन डिझायनरने तिचा हा गाऊन डिझाईन केला होता. प्रबल याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओजमध्ये आलियाचा एक व्हिडीओ लक्षवेधक ठरला आहे, त्या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर्स आलियाला ऐश्वर्या असे बोलावताना दिसत आहे. त्यावर आलिया मागे वळते फोटोग्राफर्संना पोज देते, हसते आणि निघून जाते. त्यावेळी प्रबल तिचा गाऊन नीट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चनचे नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रसिद्ध आहे. पण ऐश्वर्या राय बच्चन मेट गालापेक्षा कान्समुळे जास्त चर्चेत असते. आलियाने मेट गालाच्या रेड कार्पेटवरील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्यासोबत पोस्ट शेअर करत तिचा हा रॉयल ड्रेस 1 लाख मोत्यांपासून तयार केला असल्याचा उल्लेखही तिने केला आहे.


























































