असे कोणते कपडे… मलायकाला बघून चाहत्याला पडला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री मलायका खान तिच्या लूक आणि वेशभूषेमुळे कायम चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या बेज कलरच्या आऊटफिटमुळे. तिचा हा लूक पाहून एक वयस्कर चाहता तिच्याकडे पाहतच राहिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या कपड्यांमुळे मलायका चांगलीच ट्रोल झाली आहे.

शुक्रवारी मलायका तिच्या टॅलेंट कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर दिसली. यावेळी तिने बेज कलरच्या बॉडी फिटींग टॉप, टाईट लेगिन्स आणि त्यावर निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट असे कपड्यांमध्ये दिसली. ऑफिसच्या बाहेर येताच पॅपराजींनी तिला घेराव घातला आणि तिचे अनेक फोटो, व्हिडीओ घेतले. मात्र त्यानंतर सोशल मीडीयावर व्हायरल झालेला एक व्हीडीओमुळे मलायका चांगलीच ट्रोल झाली आहे. हा व्हिडीओ येताच सोशल मीडीयावर युजर्संनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहीलेय, हे अशा पद्धतीचे चीप आऊटफीट्स का घालतेस, तिला बॉडी रिवील करताना भान राखले पाहिजे. एकाने लिहीलेय थोडे सभ्य कपडे घालत जा. तर अन्य एका युजरने मलायका वैयक्तिक आयुष्यावरही प्रतिक्रिया केली. त्यामध्ये लिहीलेय, सेक्सी आणि अश्लिलतेमध्ये फरक आहे…घटस्फोटानंतर अशाप्रकारच्या वागण्यात वाढ झाली आहे.

मलायका तिच्या कपड्यांवरून ट्रोल झाली आहे. असे कोणते कपडे तिने घातले आहेत ते जाणून घेऊया. या व्हिडीओमध्ये बेज कलरच्या आऊटफिट पाहून एक वयस्कर व्यक्ती मलायकाकडे बघत आहे. जे पाहून नेटकऱ्यांनी मात्र आनंद घेतला आहे. एका यूजरने लिहिले – ‘काका ऑन टार्गेट.’ एकाने लिहिले- ‘मागे बघ.’ भविष्यात अशा अधिक टिप्पण्या आहेत. तर अन्य एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, ‘अहो काका, तुम्ही काय पाहत आहात.’ दुसर्‍याने लिहिले- ‘काकांना दया येत आहे.’ ‘काका शॉकमध्ये.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकांच्या या प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच, मलायका तिच्या आउटफिटशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत असते. नुकतीच ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत सिटी ऑफ लव्ह म्हणजेच पॅरिसमध्ये होती. पॅरिसमधील तिच्या सुंदर फोटोंनी तिच्या चाहत्यांची मने जिंकली.