
दबंग सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीने अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. सोनाक्षी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नुकतेच सोनाक्षीने सिल्व्हर लूकमध्ये फोटो शेअर केले आणि ती भाव खाऊन गेली. सोनाक्षीने हे नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षीने एका वेगळ्याच लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. त्याची आता चर्चा होत आहे.

सोनाक्षीच्या या लूकची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. तर काही यूजर्संना तिचा हा लूक अजिबात आवडलेला नाही.

लॉन्ग गाऊनसोबत केसांच्या रंगामुळेही सोनाक्षीचा लूक हटके दिसत आहे. सोशल मीडीयावर सोनाक्षीचे हेे लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

सोनाक्षी सिन्हा आपल्या खासगी आयुष्याबाबत कायम चर्चेत असते. नुकतेच सोनाक्षी बॉलीवूड अभिनेता जहीर इकबालला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनी यावर शांत राहणं पसंत केले आहे.

सलमान खानच्या दबंग सिनेमातून आपल्या कारकिर्दीली सुरुवात करणारी सोनाक्षी 2021 साली ‘भुज’ या सिनेमात दिसली होती.

सोनाक्षी सिन्हा ही लवकरच ‘काकुदा’ आणि ‘डबल एक्सएल’ या आगामी सिनेमात दिसणार आहे.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिचे 22.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

























































