
रिच फील स्पामध्ये महिलांची तस्करी करुन त्यांना वेश्याव्यवसायात ढकलल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्जदाराची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. पीडितेने नोंदवलेल्या जबाबात अनैतिक तस्करी करून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप नसल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने अर्जदाराची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
पुण्यातील रिच फिल स्पामध्ये महिलांची अनैतिक तस्करी करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाप्रकरणी संत तुकाराम पोलीस ठाण्यात स्पाचा व्यवस्थापक अक्षय सुतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी सुतार याने अर्ज केला, मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर सुतार याने हायकोर्टात अॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सुतारची 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.




























































