
1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी कुख्यात गँगस्टर अबू सालेम याची शिक्षा कमी करून लवकर सुटका करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळावी आणि तुरुंगातून लवकर सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी सालेमने याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अजय एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल आर. खाता यांच्या खंडपीठाने त्याची ही याचिका फेटाळली.
अबू सालेम याला पोर्तुगाल येथून प्रत्यार्पण करत नोव्हेंबर 2005 मध्ये हिंदुस्थानात आणले होते. त्याला फेब्रुवारी 2015मध्ये विशेष टाडा न्यायालयाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र मी तुरुंगात 25 वर्षांपेक्षा जास्त घालवले आहेत. त्यामुळे माझी सुटका करण्याची मागणी सालेमने केली होती.































































