बॉक्सर झेलतोय नशिबाचा मार, आबिद खान यांच्यावर रिक्षा चालवण्याची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर आबिद खान यांच्यावर ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. बॉक्सिंग करताना भल्याभल्यांना इंगा दाखवणारे आबिद खान आज नशिबाच्या माऱयापुढे हतबल झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ अभिनेता फरहान अख्तर याने ट्विटरवर शेअर करत त्यांचा फोन नंबर मिळेल का, अशी विचारणा केली आहे.

व्हिडीओत आबिद खान बॉक्सिंगच्या काही ऍक्शन करताना दिसत आहेत. ते म्हणतात, माणसाचं जीवन म्हणजे सर्वात मोठा शाप आहे. त्यातही तो गरीब असणं आणि स्पोर्ट्समॅन असणं यासारखा मोठा शाप कुठलाच नाही. मी खेळाडू आहे. माझ्याकडे डिप्लोमा असून मला नोकरी मिळाली नाही. प्रत्येक ठिकाणी जागा नाही, असं मला सांगण्यात आले. आबिद खान यांचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत असून लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.