नव्या शैक्षणिक योजना, उपक्रमांना ब्रेक; शिक्षणाचे बजेट 23 कोटींनी केले कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या शैक्षणिक योजना आणि उपक्रमांना ब्रेक देत तर जुने उपक्रम कायम ठेवत मुंबई महापालिकेने आज 3 हजार 347 कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. मात्र, तो सादर करताना शिक्षणाचे बजेट तब्बल 23.11 कोटींनी कमी केले. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शैक्षणिक अर्थसंकल्प इकबाल सिंह चहल यांना सादर केला. आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई, आयबी शाळांची उभारणी, डिजिटल क्लासरूम, ई-वाचनालय, आर्थिक साक्षरता मिशन, स्वयंसिद्ध प्रशिक्षण, रस्ता सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, स्थलांतरित शाळाबाह्य बालक मोहीम, करिअर समुपदेशन कार्यक्रम यासारखे शैक्षणिक उपक्रम कायम ठेवण्यात आले आहेत.  

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार गेल्या तीन वर्षांपासून मुलांना मोफत डिजिटल आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. कोरोना काळातही ऑनलाईन माध्यमातून सर्जनशीलता जपत मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग आधुनिक टॅब आणि इतर साहित्यांतून विविध उपक्रम आणि अभ्यासक्रम राबवत आहे. मात्र, कोरोना काळानंतर आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणात आणखी भरीव तरतूद करण्यात येण्याची अपेक्षा करण्यात येत असताना महापालिकेने 23.11 कोटींची कात्री लावून सर्वांना धक्का दिला. दरम्यान, काही उपक्रम आधीच सुरू झालेले असतानाही त्यांना 2023-24 या नव्या आर्थिक वर्षांमधील योजना आणि उपक्रमांमध्ये दाखवण्यात आले आहे. मुख्याध्यापकांना नेतृत्व काwशल्य प्रशिक्षण, काwशल्य विकास प्रशिक्षण 2022-23 मध्ये सुरू करण्यात आले आहे, मात्र याचा समावेश नव्या उपक्रमामध्ये दाखवण्यात आला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 28.45 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.

  • महापालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, शालेय परिसर यांना समाजपंटकांपासून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
  • शाळांच्या इमारतींच्या संरक्षक भिंतींच्या आतल्या बाजूला विद्यार्थ्यांना शैक्षणिक, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे बोलक्या चित्रांचे रेखाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन आणि शैक्षणिक क्षमता वाढणार आहे.
  • मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच त्यांच्यातील निरीक्षण, एकाग्रता, आकलन क्षमता, चौकसपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण गणित आणि विज्ञान पेंद्र उभारणी करण्यात येणार आहे.
  • शिक्षण विभागांच्या उपक्रमांची चित्रफितीद्वारे प्रसिद्धी केली जाणार आहे. यात शैक्षणिक उपक्रमांसह संगीत, कला, शारीरिक शिक्षण, स्काऊट-गाईड यांच्या वतीने होणाऱया स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱया शाळा आणि मुलांचीही दखल घेतली जाणार आहे. त्यासाठी चित्रफितीची निर्मिती केली जाणार आहे.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर सामान्य मुलांप्रमाणे आनंददायी मिसळता यावे यासाठी त्यांच्या फिजिओ, स्पीच आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी आवश्यक साहित्य खरेदी केले जाणार आहे.

मुख्याध्यापक, शिक्षक बदल्यांसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर

मुंबई महापालिकेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे. बदल्यांचे धोरण निश्चित करून मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीस पात्र शिक्षकांना 20 शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा वारंवार उल्लेख

पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही निवडक भाजप नेत्यांचा वारंवार उल्लेख करत त्यांच्याकडून सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करणार आहे, असे सांगितले. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प जरी इकबाल सिंह चहल यांनी मांडला असला तरी या अर्थसंकल्पातील काही योजना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमागे सूत्रधार कोण आहे, याचे वास्तव चित्र माध्यमांसमोर पत्रकार परिषदेदरम्यान आले.

सुरू असलेल्या कल्याणकारी योजना, उपक्रमांसाठी तरतूद

  • शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा (प्राथमिक-माध्यमिक-162 कोटी)
  •   जलशुद्धीकरण यंत्रांची देखभाल-दुरुस्ती (1 कोटी)
  • मुलींचा उपस्थिती भत्ता (विद्यार्थिनींसाठी मुदत ठेव योजना) प्राथमिक माध्यमिक-53.68 कोटी
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना (2.20 कोटी)
  • माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य (50 लाख)
  • अत्याधुनिक बैठक व्यवस्था (प्राथमिक-माध्यमिक-8.17 कोटी)
  • बेस्टअंतर्गत मोफत प्रवास (प्राथमिक-माध्यमिक-5 कोटी 31 लाख)
  • आधुनिक अग्निशामक साहित्य, उपकरणांची खरेदी (3 कोटी)
  • क्रीडा संकुल (50 लाख)