ब्रिटनमध्ये एका दिवसात नागरिकांनी रिचवली 28 लाख लिटर बीअर

ब्रिटनने कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवताच देशभरात नागरिकांनी मोठा जल्लोष केला आहे. शनिवार आणि रविवारी वीकेंडचा मुहूर्त साधत एकाच दिवसात 30 लाख नागरिक फिरायला बाहेर पडले. त्यामुळे देशातील 50 हजार पब्स आणि बीअर बार हाऊसफुल्ल झाले होते. शनिवारी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पण देशाच्या अन्य भागात त्याच वेळेस नागरिकांनी हॉटेल्स, पब्स, बार तुडुंब भरत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा जल्लोष साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या