सीट बेल्ट लावला नाही म्हणून ऋषी सुनक यांना दंड

rishi-sunak-uk

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीट बेल्ट लावला नाही म्हणून दंड ठोठावण्यात आला आहे. ऋषी सुनक यांनी हा दंड भरला असून त्यानंतर त्यांनी गुरुवारी एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी माफी देखील मागितली आहे.

ऋषी सुनक हे पश्चिम ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी गाडीत मागच्या सीटवर बसून एक व्हिडीओ रेकॉर्ड केला व तो व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्रामवर टाकला होता. त्या व्हिडीओत त्यांनी गाडीमध्ये बसलेले असतानाही सीट बेल्ट लावला नव्हता. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला.

बोरिस जॉनसन यांनाही ठोठावलेला दंड़
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला होता. बोरिस जॉनसन हे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क न लावता गेले होते. त्यामुळे त्यांना दंड ठोठावला.