मायावतींनी भाच्यालाच पुन्हा बनवले उत्तराधिकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पुन्हा आपला भाचा आकाश आनंद यालाच आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय समन्वयक पदाचीही जबाबदारी आकाशवर सोपविण्यात आली आहे. आता आकाश पक्षाचे संपूर्ण देशातील काम पाहणार आहेत. बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत मायावती यांनी याबाबतची घोषणा केली. आकाशही या बैठकीत सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकी दरम्यान मायावती यांनी 7 मे रोजी म्हणजेच 47 दिवसांपूर्वी आकाश यांना अपरिपक्व असल्याचे सांगून महत्त्वाच्या पदांवरून त्यांची हकालपट्टी केली होती. आकाश हेच माझे एकमेव उत्तराधिकारी असून येणाऱ्या काळात आकाश परिपक्व नेता म्हणून उभारी घेतील. पक्षातील लोकांनीही आकाश येणाऱ्या काळात सर्व कसोटय़ांवर यशस्वी होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहनही मायावती यांनी बैठकीदरम्यान केले.