बुलढाणा – विद्युत तार शेतकऱ्याच्या अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू

file photo

मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रमेश श्रावण तायडे (50) यांच्या अंगावर विद्युत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात महावितरणच्या चुकीमुळे झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी यांनी आमदार राजेश एकडे व शासनाकडे केली.
तायडे हे शेतमालक मोतीलाल सोनटक्के यांच्या हरणखेड शिवारातील शेतात सरी टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक दुपारी 3 दरम्यान महावितरण कंपनीची विद्युत तार तुटली व या शेतमजुराच्या अंगावर पडल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या