गरीब जनतेला पैसा मागाल तर याद राखा, पालकमंत्री कुटेंचा अधिकाऱ्यांना इशारा

23


सामना प्रतिनिधी । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब जनतेकडे कोणत्याही कामासाठी पैसे मागाल व माझ्याकडे तक्रार आली तर मला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा कामगार मंत्री तथा पालकमंत्री संजय कुटे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

गुरुवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नियोजन मंडळाच्या सभागृहात पार पडल्यानंतर पालकमंत्री संजय कुटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्याजवळ वेळ कमी आहे. 20-20 मॅच मला खेळायची आहे. पुढील पाच वर्ष टेस्ट मॅच खेळणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षाचे जिल्ह्याचे व्हीजन तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधित सर्व कार्यालयाला दिले आहे. आचारसंहिता येत्या दोन महिन्यात लागणार आहे. त्यापूर्वी मेडीकल कॉलेजचा विषयासह महत्वाचे विषय निकाली काढायचे आहे. खामगाव-जालना रेल्वे मार्गाबाबत2020 च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी सांगून जिल्ह्यात रिक्त असलेले अधिकार्‍यांचे पदे भरणे व बालकामगार मुक्त जिल्हा करणे, याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देणार आहे. त्याच सोबत रेतीची तस्करी रोखणे याबाबत कठोर पावले उचलणार असल्याचेही पालकमंत्री संजय कुटे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमूलकर प्रामुख्याने उपस्थितीत होते.

आपली प्रतिक्रिया द्या