
मिंधे गटातील आमदार संजय गायकवाड हे एका शेतकऱ्याला फोनवरून शिवीगाळ करतानाची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. अनिल गंगित्रे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात बोलायला गंगित्रे यांनी फोन केला होता. एका वृत्तवाहिनीने ही ऑडिओ क्लिप दाखवली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण
संजय गायकवाड – तुम्हाला समजतं का बाबा का काही? समजत नसेल तर हे तमाशे बंद करा. नाटकं बंद करा
अनिल गंगित्रे – तमाशाचं कामच नाही साहेब, आम्हाला जस जसं माहित पडलं.
संजय गायकवाड – तुमच्याकडे चुकीची माहिती दिली. माझ्याकडे या मी तुम्हाला दाखवतो सर्व रेकॉर्ड्स
अनिल गंगित्रे – अधिकारी आम्हाला चुकीची माहिती कशी देतील. ते काम करतायत त्यावर ते कशी चुकीची माहिती देणार ते सांगा.
संजय गायकवाड – अरे कोणता अधिकारी नाव सांग तू
अनिल गंगित्रे – साहेब नाव कसं काय सांगणार. ते आम्हाला सहकार्य करतायत आणि आम्ही तुम्हाला नाव सांगायचं. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर चढायचं. असं थोडी होतं. तुम्ही पण प्रयत्न करताय आम्ही पण प्रयत्न करतोय.
संजय गायकवाड – ही पद्धत नाही ना नौटंकी करायची.
अनिल गंगित्रे – साहेब, नौटंकी तुम्हाला वाटतेय पण आम्हाला त्रास भोगावा लागतोय. म्हणून आम्ही इथे आलो.
संजय गायकवाड – ही तुमची शंभर टक्के नौटंकीच आहे. तुम्हाला योजना समजत नाही.
अनिल गंगित्रे – साहेब मी पण विचारलं आहे. ते स्ट्रक्चर मिरी ऑफिसला नाशिकला अडकलं आहे. ते मंजूर झालं तर टेंडर निघेल. तु्म्ह पण माहिती घ्या पुन्हा काम करतोय
संजय गायकवाड – चाळीस वर्ष आम्ही काम करतोय तु मला नको शिकवू
अनिल गंगित्रे – कुणी काम केलं नाही म्हणून आम्ही करतोय. मला जर असं वाटलं असतं तुम्ही करताय. प्रोग्रेस दिसली असती तर कशाला आलो असतो.
संजय गायकवाड – तुम्ही केली म्हणता ना… (शिवी)
अनिल गंगित्रे – हे शब्द कोणते वापरताय साहेब तुम्ही. मी तुम्हाला शिवी दिली का?
संजय गायकवाड – नीट बोल ना मग तुम्ही
अनिल गंगित्रे – मी शिवी दिली का तुम्हाला?
संजय गायकवाड – अरे तुला ( शिवी)
अनिल गंत्रित्रे – तुम्ही आमदार आहात तुम्हाला समजतंय का तुम्ही कोणती भाषा वापरताय.
संजय गायकवाड – तु मला शिकवतोय का? (शिवी) (शिवी)
अनिल गंगित्रे – तुम्ही असे गैरवर्तणूक करत असाल तर काय लोकांची कामं करत असाल.
संजय गाय़कवाड – अरे सोड़ रे तू नको आम्हाला शहाणपणा शिकवू ((शिवी)
एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले असून त्यांनी ही व्हायरल कथित ऑडिओ क्लिपही दाखवली. सामना त्या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची कोणतीही पुष्टी करत नाही.






























































