सीएनजी पुन्हा महागल्यानं पुणेकर हैराण; डिझेलच्या दराजवळ पोहोचला सीएनजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणेकऱ्यांच्या खिशावर आता सीएनजी दरवाढीचा भार असणार आहे. पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी गॅस दरात एक रुपयाची वाढ झाली असून आता सीएनजीचा दर 92 रुपये प्रति किलो इतका असेल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत.

दरम्यान गेल्या महिन्यात सीएनजीच्या दरात तब्बल चार रुपयांची दर वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रुपयाची दरवाढ झाली आहे. यामुळे सीएनजीने आता जवळपास डिझेलचा दर गाठला. डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात अवघ्या 36 पैशांचा फरक उरला आहे. पुणे शहरात डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे.

सीएनजी दरवाढीचा फटका पुण्यातील वाहन चालक, रिक्षा चालकांना बसणार आहे.