लॉकडाऊनमुळे पार्लरचा व्यवसाय झाला ठप्प, महिलेने घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार्लरचा व्यवसाय हा कायम फायद्यातला व्यवसाय असे बोलले जाते. मात्र लॉकडाऊनचा या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. पार्लरमध्ये जवळचा संपर्क येत असल्याने महिला व पुरुष पार्लरला जाण्यास धजावत नाहीए. त्यामुळे अनेक पार्लर वाले आर्थिक संकटात सापडले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका पार्लर चालवणाऱ्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. लॉकडाउनमुळे तिच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. अस्मिता वाजानी असे त्या महिलेचे नाव असून ती घाटलोडीआ भागात वृंदावन सोसायटीत कुटुंबासोबत राहायची. लॉकडाऊनमुळे तिचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यानंतर पार्लर सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरही फार ग्राहक येत नव्हते. त्यामुळे अस्मिता या नैराश्यात गेल्या होत्या. त्यातुनच त्यांनी हे पाऊल उचलले.