
कंबोडियामध्ये जवळपास 650 हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना ‘सायबर स्लेव्ह’ म्हणजे सायबर गुह्यासाठी गुलाम करण्यात आले आहे. त्यांची फसवणूक करून त्यांना ‘सायबर स्कॅमिंग’ कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले गेलेय. या नागरिकांची सुटका करण्यासाठी कंबोडियातील हिंदुस्थानी दूतावासाने प्रयत्न सुरू केलेत. 650 हून अधिक नागरिकांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्याचे ध्येय असल्याचे हिंदुस्थानी दूतावासाने सांगितले.