शिर्डी साईभक्तांचा पाठलाग करीत लुबाडणाऱ्या एजंटांची धरपकड मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झटपट दर्शनासह स्वस्तात रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या 20 ते 25 दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिर्डीत प्रवेश करताच हे दलाल दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करतात आणि विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. भाविकांनी नकार दिल्यास अनेकदा त्यांना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केलीये.

शिर्डी पोलिसांकडून अनेकदा दलालांवर कारवाई करण्यात येते मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसातच पुन्हा भाविकांना फसवणूकीचे प्रकार सुरू होतात. आता शिर्डी पोलिसांनी भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या दलालांना चाप लावण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात केलय. आज दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणाऱ्या 20 ते 25 दलालांना ताब्यात घेत शिर्डी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीये. अशी कारवाई पुढे देखील सुरूच राहाणार असून भाविकांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केलंय.