
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जात असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट गाडीची कंटनेरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले.

अपघातग्रस्त कारला पुण्याकडून येणाऱ्या कंटेनरने समोरून धडक दिली असून कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. मयतांची ओळख अजून पटलेली नाही. माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस व आयआरबी देवदूत पेट्रोलिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे काही काळासाठी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.


























































