सहकारनगरमध्ये देशी दारू दुकानातील रोकड लुटली

हातात धारदार लोखंडी शस्त्र आणि पिस्तुलसदृश वस्तूच्या धाक दाखवून टोळक्याने देशी दारू दुकानातील 57 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सातारा रस्त्यावरील दुकानात घडली.

याप्रकरणी नामदेव खंडू जांगटे (42, रा. बावधन ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार नामदेव सातारा रस्त्यावरील एका देशी दारू विक्री दुकानात कामाला आहेत. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सहाजणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र आणि पिस्तूलसदृश वस्तूचा नामदेव यांना धाक दाखविला.

त्यांनी विरोध केला असता, चोरट्यांनी त्यांना मारहाण करून दुकानातील 57 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या