इंदिरा जयसिंग यांच्या घर, कार्यालयांवर सीबीआयच्या धाडी

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

परदेशातून मदतनिधी लाटल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या ख्यातनाम वकील इंदिरा जयसिंग यांच्या घरासह नवी दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकले. निझामुद्दीन येथील घर तसेच जांगपुरा येथील ‘लॉएर्स कलेक्टिव्ह’ या संस्थेचे कार्यालय आणि मुंबईतील कार्यालयाची पहाटे 5 वाजल्यापासूनच झाडाझडती घेण्यात आली.

इंदिरा जयसिंग यांचे पती आनंद ग्रोव्हर ‘लॉएर्स कलेक्टिव्ह’ ही स्वयंसेवी संस्था चालवतात. या संस्थेने परदेशातून मिळवलेल्या मदतनिधीमध्ये बऱ्याच विसंगती असल्याचा आरोप करत केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार केली होती. त्याआधारे सीबीआयने ग्रोव्हर यांच्याविरोधात ‘फॉरेन कॉन्ट्रीब्युशन (रेग्युलेशन) ऍक्ट’चे (एफसीआरए) उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. संस्थेने मात्र सर्व आरोपांचे खंडन केले होते.

काय आहे आरोप?

‘लॉएर्स कलेक्टिव्ह’ संस्थेने 2006-07 ते 2014-15 या कालावधीत परदेशातून 32.39 कोटींहून अधिक मदत मिळवली होती, मात्र ज्यावेळी यामध्ये अनियमितता आढळून आली त्यावेळी ‘एफसीआरए’चे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले.

आपली प्रतिक्रिया द्या