
टॅटूच्या विश्वात आपली ओळख प्रस्थापित करणारा तरुण म्हणजे सनी भानुशाली. सनीने सर्वोत्तम फोटो-रिऑलिस्टिक आणि हायपर-रिऑलिस्टिक टॅटू तयार केले आहेत. या कामगिरीबद्दल अनेक सन्मान त्याच्या वाटय़ाला आले आहेत, पण तोपर्यंतचा सनीचा प्रवास खूप खडतर होता. तरीही कलेवर लक्ष केंद्रित करत सनीने यश मिळवले.
सनी भानुशालीने इंटरनेटवर व्हिडीओ पाहून टॅटू कला आत्मसात केली. कस्टम डिझाइन्समध्ये त्याने विशेष प्रावीण्य मिळवले आणि त्यातून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. 2011 मध्ये, त्याने एलियन्स टॅटूची स्थापना केली आणि हिंदुस्थानला कस्टम डिझाइन्स, वास्तविकता आणि पोट्रेट टॅटूच्या संकल्पनेची ओळख करून दिली. त्याच्या या कलेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॅटू संमेलनांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहली आणि हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, इशान किशन आणि इतर अनेक सेलिब्रेटींनी सनीच्या टॅटू कौशल्यावर विश्वास दाखवला आहे.
– सध्याच्या फॅशनच्या जगात टॅटू काढण्याचा ट्रेंड आहे. त्यानुसार सनी भानुशालीने या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. त्याने कस्टम डिझाइन्स, वास्तविकता आणि पोर्ट्रेट टॅटूच्या संकल्पनेची ओळख त्याने करून दिली. केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे नाव पोचले आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रेटी त्याच्याकडून हटके टॅटू काढून घेतात.
अनेकांना देताहेत प्रशिक्षण
2018 मध्ये सनीने एलियन्स टॅटू आर्ट स्कूलची कल्पना वास्तवात आणली. टॅटू आर्ट स्कूलमध्ये टॅटू उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या कलावंतांना मार्ग मिळाला. तो एलआयएलए – लर्न इट लाईक एलियन्स या ऑनलाइन टॅटू शिकण्याच्या प्लॅटफॉर्मचा संस्थापकही आहे. देशात जवळपास 13 हून अधिक ठिकाणी त्यांच्या फ्रँचायझी आहेत. एलियन टॅटू आर्ट स्कूलने आजपर्यंत 550 हून अधिक कलाकारांना यशस्वीरीत्या प्रशिक्षण दिले आहे आणि तो अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.




























































