
येत्या 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ साजरा करण्याचे फर्मान पेंद्र सरकारने काढले होते. मात्र, या निर्णयावरून चौफेर टीका झाल्यानंतर सरकारला उशिरा शहाणपण सुचले असून, ‘काऊ हग डे’चा आदेश मागे घेण्यात आला आहे.
14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. पण यावर्षी पेंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने एक परिपत्रक काढून त्यादिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे निर्देश दिले होते.



























































