ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पो पळविला

232

ऑक्सिजन सिलिंडर केळेकर न भेटल्यामुळे एकीकडे कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागत असताना दुसरीकडे चाकण-म्हाळुंगे येथे चोरटय़ांनी ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पोच पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱया 12 ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पोच चोरटय़ांनी लांबविला. बाबूराव बिसाजी चौधरी यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. चौधरी हे म्हाळुंगे भागात दोन-तीन कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन सिलिंडरद्वारे विविध रुग्णालयांत पुरवठा करण्याचे काम करतात. 10 सप्टेंबर रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे काही सिलिंडर रुग्णालयांमध्ये नेऊन दिले. त्यानंतर उर्वरित टेम्पो त्यांनी रात्री घराबाहेर उभा केला. मध्यरात्री दोन ते सकाळी आठ या कालावधीत चोरटय़ांनी सिलिंडरसह टेम्पो चोरून नेला.

आपली प्रतिक्रिया द्या