नायडूनीती, बेरोजगार ब्राह्मण तरुणांना कारवाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

लोकसभेची निवडणूक अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय पक्षांनी मतांची बेगमी सुरू केली आहे. आंध्र प्रदेशात ‘तेलगू देसम’च्या सरकारचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार ब्राह्मण तरुणांना ‘स्वीफ्ट डिझायर कार’चे वाटत करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकेच नव्हे तर, आणखी एका योजनेखाली नायडू यांचे सरकार 1 कोटी 40 लाख स्मार्ट फोनचेही वाटप करणार आहे. बेरोजगार ब्राह्मण तरुणांना कारचे वाटप करण्याच्या उपक्रमात पहिल्या टप्प्यात 50 तरुणांना स्वतः चंद्राबाबू नायडू हे कारच्या चाव्यांचे वाटप करणार आहेत.

स्वीफ्ट डिझायर कार मिळवण्यासाठी बेरोजगार ब्राह्मण तरुणांना केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. कारसाठी ब्राह्मण विकास महामंडळाकडून दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम आंध्र प्रदेश ब्राह्मण सहकारी सोसायटीद्वारे मासिक हप्त्यांनी देण्यात येईल.