Video – मास्क नसल्याने तहसीदारांनी भाजप नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी, यासाठी निवेदन घेऊन जाणाऱ्या भाजप शिष्टमंडळाला तहसीलदाराने मास्क नसल्यामुळे बाहेर जाण्यास सांगितल्याचा प्रकार घडला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील कार्यालयावर भाजप कार्यकर्ते धडकले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्य़ांना मदत मिळावी, यासाठी सरकारने घोषणा केल्या होत्या. मात्र दिवाळी तोंडावर आली असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. सरकारला जागे करण्यासाठी भाजपने आंदोलन केले.

मागणीचे निवेदन तहसीलदार श्रीमती सोळंके यांना देण्यासाठी शिष्टमंडळाने कक्षात प्रवेश केला. पण निवेदन घेण्यास तहसीलदारांनी नकार दिला. आधी मास्क लावा आणि नंतर या, असे ठणकावले. त्यामुळे संतप्त भाजप नेते बाहेर पडले आणि त्यांनी तहसील आवारात मास्क लावून आंदोलन सुरू केले. तेव्हा तहसीलदार सोळंकी यांनी बाहेर जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.