
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या लॉयड्स मेटल या लोह प्रकल्पाचा सध्या विस्तार केला जात आहे आणि यासाठी म्हातारदेवी गावाजवळ मोठ्या कॉलनीचं निर्माण केलं जात आहे. मात्र यासाठी ग्रामपंचायतीची कुठलीच परवानगी न घेता अनधिकृतपणे कॉलनीचे बांधकाम केलं जात असल्याचा ग्रामपंचायतीने आरोप केला आहे. नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणाऱ्या कुठल्याही बांधकामासाठी ग्रामपंचायत आणि पर्यायाने ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते. मात्र लॉयड्स मेटल्सने या साठी कुठलीच परवानगी घेतली नसल्याचा ग्रामपंचायतीने आरोप करत कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.


























































