Chandrapur News भरधाव ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगात आलेल्या ई-रिक्षाने घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव गावात घडली. श्रीजा महेश गहाणे असे मृतक मुलीचे नाव आहे. वेगात असलेल्या वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने या रिक्षाने थेट चिमुकलीला धडक दिली.

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या श्रीजाला तातडीने आधी नवरगाव आणि त्यानंतर नागभीड येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे नवरगाव परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तातडीने कारवाई करत ई-रिक्षा चालक प्रेमा नारायण चहांदे (रा. लाडबोरी) याला अटक केली आहे. आरोपी चालकाविरोधात सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.