
सामना प्रतिनिधी। चंद्रपूर
कोंबडा बाजारावर धाड टाकून साडेचार लाखाच्या मुद्देमालासह 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सावली पोलिसांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यातील सावली तालुक्यातील कवठी गावातील कोंबळ बाजारावर ही धाड टाकण्यात आली. यावेळी मुद्देमालासह 10 आरोपींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या धाडीत 9 कोंबडे, 4 मोटार सायकल ,1 चारचाकी व आरोपीजवळ 10,190 रुपये असा एकूण किंमत 4,62,190 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 10 आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात करण्यात आली आहे.































































