विचित्र अपघातात जवानाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चापोली

सु्ट्टी घालवण्यासाठी घरी आलेल्या जवानाचा चापोली व चाकूर रोडवर झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाला. सूर्यकांत टाळकुटे असे त्याचे नाव असून तो मष्णेरवाडीचा रहीवासी होता. तो मंगळवारी योगेश देवकत्ते या मित्राबरोबर मोटरसायकलवरून चापोली व चाकूर रस्त्यावरून जात होता. तेवढ्यात अचानक भरधाव येणाऱ्या कारची धडक मोटरसायकलला बसली. यात सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र योगेश हा जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच युवा सेनेचे तालुक प्रमुख पाडुरंग बुंदराळे ,नवनाथ गोरगिळे ,विश्वनाथ पाटील यांच्या सह इतरांनी सूर्यकांत व योगेशला तातडीने चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने सुर्यकांत टाळकुटे यांना मयत घोषित केले. तर योगेश देवकत्ते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले. सुर्यकांत टाळकुटे हे लेह लडाख येथे 12 बटालियन महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते सुट्टी घेवून गावी आले होते. शनिवारी 12 ला ते लेह लडाखला देशसेवेसाठी परत जाणार होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुभाष हरणे, माधव सारोळे व सूकेश केंद्रे हे करीत आहेत.